असे काही

( http://www.manogat.com/node/19012 )

तुला पाहून झाले असे काही
स्पर्शून स्वप्न जावे- तसे काही

आज बोलून गेली असे काही
बोलणे संपवावे- तसे काही

चेहर्‍याची हवी ती छबी देती
चला शोधू असे आरसे काही…

मौन सोडी सखे एकदाचे हे
शब्द आणीन मी छानसे काही!

उद्या गावात होईल बोभाटा
तुझ्या गावीच नाही कसे काही ?

चढाओढीत ह्या जीवघेण्याही-
जिवाला जीव देती असे काही

कितीदा हाक देशील आयुष्या
तुला ठाऊक नाही जसे काही !

5 प्रतिसाद to “असे काही”

  1. Abhijeet Sawant's avatar Abhijeet Sawant Says:

    chaan aahe.

  2. हेमंत आठल्ये's avatar हेमंत आठल्ये Says:

    मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  3. anonymous's avatar anonymous Says:

    chaan ahe

Leave a reply to वाचून बघा उत्तर रद्द करा.