( एकाच ‘जमिनी’तून आलेल्या दोन्ही रचना एकत्र देत आहे)
संपला विश्राम कामा लागुया
शोधुनी थकवा नवीन पाहुया
दाटून ओथंबणे बरसणे पुरे
खूप झाला शोक थोडे हासुया
मृत्युची कौतुके कोणी करावी
संपले नाविन्य त्याचे सांगुया
याचकांच्या वाढत्या गर्दीमध्ये
कुणी दाता भेटतो का पाहुया
घट्ट मिटुनी ओठ जीणे नको
जून झाले मौन ताजे बोलुया
रात्र सरली तारका मंदावल्या
जाग ये गावास आता जाउया
विन्मुख तो कोणाहि ना धाडतो
हात देणारेच त्याचे मागुया ! *
(* ” देणार्याचे हातच घ्यावे…” ह्या उत्तुंग ओळींवरुन साभार! )
******
साधतो का हा तराणा पाहुया
सूर लावून तो पुराणा पाहुया
आजही ती येणार नाही म्हणे
आज कोणता बहाणा पाहुया
ध्येयवेडे दौडले निखार्यांवरी
पाय त्यांचे,त्या वहाणा पाहुया
प्रेम शोधत आजही तो हिंडतो
कोण आहे हा शहाणा पाहुया
सांगेल सारे एकदाचे आज ती
काय घाली ती उखाणा पाहुया !
07 08 2008 येथे 9:41 सकाळी |
कविता मस्त आहेत