कालचेच होते

माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते

झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
डोळे वटारलेले- ते धाकलेच होते

नावाजले जगाने सांगू तरी कुणाला
की नाव आपल्यांनी तर टाकलेच होते

झाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना
की कोंबडेहि सारे मी झाकलेच होते

मागावयास माफी ते पाय मी धरोनी
गेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते

दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
शोधीत आसरा ते मजसारखेच होते

हे काय आज त्यांना आले हसू नव्याने
माझे फजीत होणे तर कालचेच होते

3 प्रतिसाद to “कालचेच होते”

  1. mehhekk's avatar mehhekk Says:

    झाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना
    की कोंबडेहि सारे मी झाकलेच होते

    मागावयास माफी ते पाय मी धरोनी
    गेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते

    wah wah khup chan

  2. shrikrishnasamant's avatar shrikrishnasamant Says:

    वा! वा! किती सुंदर काव्य आहे एकाच शब्दात सांगायचं तर “फॅन्टॅस्टीक”

    “दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
    शोधीत आसरा ते मजसारखेच होते”

    हे खूपच आवडले

  3. वाचून बघा's avatar वाचून बघा Says:

    धन्यवाद !

    सतीश वाघमारे.

यावर आपले मत नोंदवा