( ॠणनिर्देशः अजय- अतुल ह्या अत्यंत गुणी जोडगोळीच्या ‘गोंधळ’ ह्या लोकप्रिय रचनेवर
आधारित, मूळ कलाकृतीशी संबंधित सर्व प्रतिभावंतांना नम्र अभिवादन करुन ! )
उदे उदे उदे उदे….
माहुरगडच्या रेणुकाईला नमस्कार माझा
भक्तातोंडी कवन वदविसी चमत्कार तुझा
आई माझ्यावरी, तान्ह्यावरी, कृपावस्त्र पांघरी
आज औक्षणाला ये,
गोंधळ मांडला रेणुके, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
तुळजापुरवासिनी भवानी तूच जगन्माता
गहिवरला हा गळा माऊली गान तुझे गाता
आज दया करी, माझ्यावरी ,जागव ही वैखरी
तुझ्या कीर्तनाला ये,
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
कोल्हापुरची अंबाबाई आदिशक्ती माता
संसारातुन पार करवसी धन्य तुझी सत्ता
आली आली स्वारी, भक्ताघरी, कृपा तुझी मजवरी
माझे अंतःकरणी ये,
गोंधळ मांडला तिथे गं, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
सप्तशृंगी नाशिकातली देवता वणीची
दर्शनमात्रे तहान पुरवी साधका मनीची
नाव जिभेवरी, चढु पायरी, आलो तुझिया द्वारी
आज भंडार्याला ये,
गोंधळ मांडला माय गं, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
11 04 2008 येथे 12:17 pm |
wah ek dam mast gondhal jamlay,aai bhavni tuljapurvasani sashtang namaskar,khup divasa nantar gondhal vachala,ekla,manat vasala,khup khup chan
16 12 2009 येथे 1:21 pm |
खुपच छान.
16 12 2009 येथे 11:21 pm |
धन्यवाद !
10 08 2010 येथे 3:50 pm |
Wah Khupach Chan. Vachun Anand Jhala. Keep it up 🙂
11 08 2010 येथे 11:35 pm |
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !