आयुष्याच्या हुंकाराला प्रथम भेटते वाट पहाणे
अव्याहत साखळीतल्या दो श्वासांमधले वाट पहाणे
वाट पहाणे चुकले कोणा-जुनी कारणे, नवे बहाणे
एकसारखे,वेगवेगळे- ज्याचे त्याचे वाट पहाणे
जागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात रहाणे
कुणी आपली वाट पहावी, ह्याची सुद्धा वाट पहाणे
वाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे
संपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे ?
पुरे थांबणे-कधी वाटले,आता तरि होऊत शहाणे
सारे सरले,काही नुरले- आता कसले वाट पहाणे?
आता कळते, नाही सरले -कधी संपते वाट पहाणे !
नित्याचे हे येणे जाणे -पुन्हा भेटुया, वाट पहाणे…
21 04 2009 येथे 11:41 सकाळी |
अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला ” क्विलपॅड ” /
आप भी “क्विलपॅड” http://www.quillpad.in यूज़ करते हे क्या…?
21 04 2009 येथे 8:32 pm |
संतोषजी,
आपको मेरा प्रयास ठीक लगा- धन्यवाद !
मराठी और हिन्दी मे टाइप करने के लिए ‘गमभन’ का प्रयोग करता हूं , जो इस लिंक पर मिल सकता है :
http://www.var-x.com/gamabhana/gamabhana_package_080220.zip
27 04 2009 येथे 10:33 सकाळी |
सतिशजी,
सूदर, अतिसुंदर काव्य.
प्रत्येक दोन ओळी एकापेक्षा एक सरस
आणि
“वाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे
संपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे ?”
सर्वात सरस
28 04 2009 येथे 12:11 सकाळी |
सामंतसाहेब, तुम्हाला बरी वाटली- बरं वाटलं !