(ॠणनिर्देशः मूळ चाल आणि प्रेरणा ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ हे सुमधुर गीत.
वृत्तः गाल गाल गाल गाल गाल गालगा )
रामजन्म आज साजरा घरोघरी
रामनाम आज घेउया परोपरी
रामजन्म आज घरी….. ॥ धृ ॥
ते चरित्र हो पवित्र रोज आठवू
शौर्य तेज रूप मानसात साठवू
रामराज्य हो मनामनात जागवू
रामनाम गात धन्य होत वैखरी ॥ १ ॥
दोन अक्षरांत मोक्षधाम लाभते
गोड नाव भाविकास वेड लावते
संकटात साधकास मार्ग दावते
रामनाम रामबाण हो खरोखरी ॥ २ ॥
03 04 2009 येथे 2:13 pm |
sunder!
04 04 2009 येथे 12:07 सकाळी |
Dhanyavaad !
22 04 2013 येथे 11:03 सकाळी |
Chan