तो सार्यांना काही न काही देत असतो
आपण काही मिळालं नाही, म्हणत रडत असतो
मिळालेलं वापरत नसतो,
न मिळालेलं विसरत नसतो
पुरेसं मिळालं नाही म्हणत कुढत बसतो
दुसर्याला जास्त मिळालं की चडफडत असतो
‘मला पुरे’ म्हणणारा इथे एखादाच दिसतो
देताना तो आपला, घेताना कुणीच नसतो
तो वरुन सारं बघत मजेत हसतो…
कधी तो घेतलेलं परत देत असतो,
कधी परत घेण्यासाठीच देत असतो
आपण माणसंही आपसात देत-घेत असतो
मिळालेलं गृहित, दिल्याचा मात्र हिशेब असतो
देवाण-घेवाण संपेतो आपण इथेच रुळतो,
कार्यभाग उरकला, की गाशा गुंडाळतो
आपल्याला परत घ्यायला तो बसलेलाच असतो,
त्याचा व्यवहार अव्याहत चाललेलाच असतो…
प्रतिक्रिया व्यक्त करा