परवाच मला भेटला- खजिल, खांदे झुकलेला
माझाच एक ताजा निर्णय- साफ चुकलेला
एकटेपणाची भावना दुखवत होती त्याला-
मी म्हटलं, तू नाहीस माझा पहिला-
नक्कीच नसशील शेवटचाही,
असा नेम हुकलेला!
…
घेऊन गेलो त्याला
भूतकाळाच्या तळघरात,
चुकल्यामाकल्यांची वरात
तिथे पाहून तो दचकला-
अहोरात्र पेटलेल्या अहंकाराच्या धुनीभोवती
दबक्या आवाजात बोलत बसलेले,
त्याला दिसले बरेच अंदाज-आडाखे
त्याच्यासारखेच फसलेले
उजळ माथ्यांचेही होते थोडे
चुकून अचूक ठरलेले,
आणि वेळ टळल्यावर घेतलेले
काही सावधपणे बेतलेले
…
माझ्याकडे शेवटचं एकदा बघून,
तो त्यांच्यात मिसळला,
बघता-बघता इतिहासजमा झाला..
…
हात झटकून मीही निघालो,
थांबायला वेळ कुठे होता?
माझी वाट पाहत खोळंबलेला
पुढचा निर्णय घ्यायचा होता !
03 02 2009 येथे 5:49 pm |
Sahi hain bhidu!
03 02 2009 येथे 11:39 pm |
Glad you liked it,friend !
05 02 2009 येथे 12:26 pm |
वाचायला खूप मजा आली
22 07 2009 येथे 11:39 सकाळी |
अशा कवितांचा मी चाहता आहे. खुप आवडली ही कविता. मस्तच.
http://asachkahitari.wordpress.com/