थरथर हाती लिहिलेले
नवथर भावे भिजलेले
स्मृतिगंधाने दरवळले
पत्र तुझे पहिले-वहिले!
‘प्रिय’शब्दाने सजलेले
हॄदयातुन जे रुजलेले
अलगद पत्रात उतरले
लाजरे बोल ते पहिले
मुग्ध गूज ओठांवरले
नजरांनी होते कथिले
सांगण्या शब्दही स्फुरले
ते पत्र तुझे गे पहिले..
बहु दिवसांनी सापडले
पुस्तकी जुन्या दडलेले
आज पुन्हा आठवले
काळिज ते धडधडलेले !
09 06 2008 येथे 9:38 सकाळी |
कविता फारच सुदर आहे.
सामंत
16 06 2008 येथे 10:36 pm |
old memories always r near the heart,surekh bhavnik sangam sundar