तसं आमचं फारसं जमत नाही
आमचं कशावरच एकमत नाही
तिच्या शिवाय मन रमत नाही,
मी नसता तिलाही करमत नाही !
आमचं शांततामय सहजीवन
टिकवायचा प्रयत्न करतो,
ती दूरवर दिसली तरी
मी चटकन उभा रहातो !
माझं तिच्याआधी येणं
तुम्हाला आवडेलसं नाही
तिचं माझ्यापूर्वी असणं
नेहेमीच घडेलसं नाही
मी नाहीच अन फक्त ती ?
एक दिवास्वप्न भोळं..
ती नसताना केवळ मी ?
आधी दिवाळी, मग दिवाळं !
रंगमंचावर मिरवायला मी
पडद्यामागून पुरवायला ती
घराघरात असतो आम्ही
माझं नाव खर्च,तिचं…प्राप्ति !
28 05 2008 येथे 6:32 सकाळी |
कविता मजेदार आहे.
वाचून आवडली.
सामंत
11 06 2008 येथे 10:18 pm |
Nice poem. Keep it up.
11 06 2008 येथे 11:56 pm |
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
सतीश वाघमारे
25 10 2008 येथे 10:02 pm |
to ani ti yacha jamakharch khup awadla
25 10 2008 येथे 11:40 pm |
धन्यवाद !
01 11 2009 येथे 3:17 pm |
nice poem
02 11 2009 येथे 1:35 pm |
Thanks !