सौंदर्य

मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तू रोजच दिसतोस
मी भेटले की, संभ्रमात, अवघडलेलं हसतोस.

माझी हुशारी, बोलणं-वागणं   तुला भावलेलं दिसतंय,
त्याचं कौतुक तुझ्या डोळ्यांत तुझ्या नकळत हसतंय !

पण.....मी दिसायला सामान्य आणि मलाही आहे मान्य
सर्वमान्य हे सत्य, की सौंदर्य तेच, जे डोळ्यांना दिसतं !

माझ्यातली ती अदृष्य सुंदरी जी तुला खुणावतेय ना,
तिच्या दृष्य रुपातली उणीव तुला अस्वस्थ करतेय, ना ?

असल्या नकारांची आताशा सवय होऊ लागलीय मला,
खरंच, पण असं का व्हावं कधीच कळणार नाही मला !

आतून आपल्या सौंदर्याला नित्य उधाण येत रहावं,
अन किनार्‍यावरच्या जगाच्या..... ते गावीही नसावं ?

कधीतरी वाटून जातं - भरतीच्या समुद्रासारखं, वहावं
ते ओसंडून बाहेर , अन अलगद सर्वांगावर पसरावं...

फार नाही, निदान इतपत तरी, की कधीतरी,
...... तुझ्यासुद्धा डोळ्यांना ते दिसावं !

8 प्रतिसाद to “सौंदर्य”

  1. Raj Says:

    तुमची अनुदिनी पहिल्यांदाच पाहिली. हिंदी आणि मराठी, दोन्ही भाषेतील कविता छान आहेत.

    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

  2. Shilpa Bhatte Says:

    अप्रतिम, केवळ अप्रतिम. या शिवाय शब्दच नहियेत. अश्याच सुन्दर सुन्दर कविता करत रहा.

  3. वाचून बघा Says:

    Am grateful, friends. Thanks for the encouragement !

  4. Anil Says:

    it really touched the deepest core of my heart.

  5. वाचून बघा Says:

    Glad you liked it, Anil ! Thanks n regards.

  6. shekhu Says:

    Wah Wah, khoopach chhan…mastach aahe! Keep writing, keep enjoying!

  7. anonymous Says:

    khup sundar poem ahe, how true,inner beauty khup kami lokana dista

  8. वाचून बघा Says:

    You seem to be on a reading spree, dear anonymous !
    Thanks for all the kind words, words the kind that are always welcome :))

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


%d bloggers like this: