सून

परवा हे रात्री बोलून गेले
कधी नव्हे ते गोड-गोड हसत,

“आपल्याला सून हवी तुझ्यासारखी–
अगदी समजूतदार, शांत ! ”

बोलून ते झोपून गेले,
अन घोरायलाही लागले.

मी  आपली गप्प, त्यांच्याकडे बघत
आतला आनंद सरावानं लपवत..
‘उशीरा का होईना.. !’ म्हणत,
नकळत होते स्वतःशीच हुरळत.

पण…बराच वेळ जागल्यावर
आले  सवयीनं भानावर
विचार केला बोलण्यावर
म्हटलं घ्यावं का ते मनावर ?

खरंच का ह्यांना आवडलंय,
आपलं आजवरचं वागणं
का ह्यांना अजून एक हवंय
बिनआवाजाचं खेळणं ?

मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी..

बाप-लेकांचे शब्द झेलणं
झालंय मला नेहेमीचं,
काम नाहिये पण हे
नवख्या पोरी-सोरीचं.

दुसर्‍याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं,
पण तिचं काय होईल ?

8 प्रतिसाद to “सून”

  1. dilip jadhav Says:

    verry good

  2. mehhekk Says:

    kharch sasubainchi chinta rastch aahe,tynche zale te zale,navya suneche kashe nibhnar.khup chan,eka stri[women] chya manatla lihile aahe.

  3. harekrishnaji Says:

    घरोघरी त्याच परी

  4. tulipsintwilght Says:

    very well said…..its a thought provoking poem that you have penned down.. keep up the good work…

  5. jayjoshi Says:

    very ni ce… and very true… but saasu dont behave like this many times… if she faced any problem than not to show it to her sun, she expects that “aamhala as zaal hote, hila pan kalal paahije” or ” khup sosal mi…. aata mi raani hote “

  6. meghana apte Says:

    very good

  7. वाचून बघा Says:

    धन्यवाद, मंडळी !

  8. shrikrishnasamant Says:

    आत्ताच तुमच्या blog वर click केलं.
    अशिच पुर्वी एकदां हीच कविता मी वाचली होती.आणि मला ती फार आवडली होती.
    आतां परत वाचल्यावर जूनी याद आली.
    छान लिहीता तुमच्या हिंदी कविता पण छान आहेत.
    श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


%d bloggers like this: