अभिव्यक्तिपुरता,
जिचा वियोग मी जेमतेम सहन करतो,
अहो, ती माझी कविता,
माझं कवित्त्व,
हेच माझं व्यक्तित्त्व
माझं सर्वस्व… नव्हे, माझं अस्तित्त्वच !
ती माझी कविताच झिडकारताय,
आणि एकट्या मलाच
मायेनं आपलं म्हणू पहाताय !
जन हो, माझं काव्य नाही नुसतं एक वाक्य,
ते तर माझं जीवनवाक्य…..
त्या वाक्यात शब्द,
शब्दांमागे आहे भाव
त्या भावातच लपलाय
माझ्या मनीचा गाव.
त्या शब्दांत घुमतोय एक नाद,
ह्या नादातच गुंतलाय….
माझा अंतर्नाद !
माझं हे वेगळेपण…
तेच नाकारताय,
मग मला कुठल्या सलगीनं हाकारताय ?
प्रतिक्रिया व्यक्त करा